AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर Navi Mumbai मध्ये अवजड वाहनांची वाहतूक बंद

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर Navi Mumbai मध्ये अवजड वाहनांची वाहतूक बंद

| Edited By: | Updated on: Jun 23, 2021 | 10:02 AM
Share

पोलिसांकडून नवी मुंबईतील महत्त्वाचे रस्ते आणि वाहतूकीत बदल करण्यात आला  आहे.आंदोलनावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याची खबरदारी घेऊन नवी मुंबईत अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसंच वाहतुकीतही मोठे बदल करण्यात आलेले आहेत. | Navi Mumbai Traffic Route Change Over Airport Naming Controvercy CIDCO Protest

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद शिगेला पोहोचला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील (D. B. Patil) यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. तर दुसरीकडे महाविकासआघाडीकडून या विमानतळाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यावर ठाम आहे. यासाठी येत्या 24 जूनला सिडकोला 1 लाख लोकांचं घेराव आंदोलन करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून नवी मुंबईतील महत्त्वाचे रस्ते आणि वाहतूकीत बदल करण्यात आला  आहे.आंदोलनावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याची खबरदारी घेऊन नवी मुंबईत अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसंच वाहतुकीतही मोठे बदल करण्यात आलेले आहेत. | Navi Mumbai Traffic Route Change Over Airport Naming Controvercy CIDCO Protest