मणिपूर हिंसाचारावरून नवनीत राणा भडकल्या; केलं मोठं विधान!
मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू असतानाच दोन महिलांसोबत अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. यावर नवनीत राणा यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
नवी दिल्ली, 21 जुलै 2023| मणिपूर मध्ये हिंसाचार सुरू असतानाच दोन महिलांसोबत अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. यावर नवनीत राणा यांचे मोठे वक्तव्य आले आहे. त्या म्हणाल्या की, “ही घटना दुर्दैवी, जिथं देवीची पूजा केली जाते, तिथं ही घटना घडते. या दोषींना धडा शिकवला पाहिजेत, महिलांचा सन्मान राखला गेला पाहिजेत, राजकारण न करता दोषींना शिक्षा दिली पाहिजे.” तसेच नवनीत राणा यांनी इर्शाळ दुर्घटनेवरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “इर्शाळ दुर्घटना दुर्दैवी आहे. आधीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 11 वाजेपर्यंत पर्यंत झोपा काढत होते, पण आताचे मुख्यमंत्री अलर्ट आहेत, त्यांना लोकांची जाण आहे,” असं राणा म्हणाल्या.

