Navneet Rana | अमरावतीत महिला रनिंग स्पर्धेत नवनीत राणांचा सहभाग
प्रांगणात महिलांसाठी रनिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी भाग घेतला. महिलांसोबत त्या धावल्या. विशेष म्हणजे ही रनिंग स्पर्धा त्यांनी जिंकलीसुद्धा.
अमरावती : राजस्थानी हितकारक महिला मंडळाच्या वतीनं येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या (Hanuman Vyayam Prasarak Mandal) प्रांगणात महिलांसाठी रनिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी भाग घेतला. महिलांसोबत त्या धावल्या. विशेष म्हणजे ही रनिंग स्पर्धा त्यांनी जिंकलीसुद्धा. खासदारांना धावताना पाहून महिलांना त्यांच्या फिटनेसचा हेवा वाटला.
महिलांनी वेळात वेळ काढून व्यायाम करावा
स्पर्धा जिंकल्यानंतर नवनीत राणा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी त्या म्हणाल्या. दैनंदिन जीवनात महिलांची खूप धावपळ होते. अशावेळी त्यांनी व्यायामासाठी वेळ काढणे अत्यंत आवश्यक आहे. स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ काढून व्यायाम केला पाहिजे. तरच तुम्ही आरोग्यसंपन्न आणि सुखी राहू शकाल, असा सल्ला राणा यांनी महिलांना दिला.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक

