Special Report | ‘NCB ला तंबाखू, गांजातला फरक समजत नाही का?’

ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक झाल्यानंतर मंत्री नवाब मलिकांनी एनसीबीच्या कारवाईवर शंका उपस्थित केलीय. आता ड्रग्ज प्रकरणात त्यांच्या जावयाला जामीन मिळाल्यानंतर पुन्हा मलिकांनी एनसीबीचा समाचार घेतला.

ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक झाल्यानंतर मंत्री नवाब मलिकांनी एनसीबीच्या कारवाईवर शंका उपस्थित केलीय. आता ड्रग्ज प्रकरणात त्यांच्या जावयाला जामीन मिळाल्यानंतर पुन्हा मलिकांनी एनसीबीचा समाचार घेतला. जावयाचा ड्रग्जशी संबंध नाही, पण तंबाखू आणि गांजामधील फरक एनसीबीला कळत नाही, अशी टीका एनसीबीने केलीय.

नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांचे जावई समीर खान यांच्या अटक प्रकरणी करण्यात आलेल्या आरोपावरून पर्दाफाश केला. एनसीबीच्या छाप्यात 200 किलो गांजा मिळाला नाही. साडेसात ग्रॅमचा गांजा फर्निचरवालाकडे मिळाला. बाकी सर्व गोष्टी हर्बल टोबॅको आहेत हे रिपोर्टमध्ये म्हटलंय. त्यामुळे एनसीबीला तंबाखू आणि गांजामध्ये फरक कळत नाही हे आश्चर्य आहे. अशा संस्थांकडे इन्स्टंट लेव्हलला टेस्ट करण्याचे किट्स असतात. गांजा नसतानाही लोकांना फ्रेम करण्यात आलं. हे मी सांगत नाही तर कोर्टाचा रिपोर्ट सांगत आहे. 27 अ हे कलम लागू होत नाही. जो काही खटला फर्निचरवाल्यावर लागतो. पण त्याला लगेच जामीन दिला. हर्बल तंबाखू सापडल्यानंतरही लोकांना फ्रेम केलं जात आहे. सिलेक्टिव्ह खबर लिक करून लोकांना बदनाम करण्याचं काम एनसीबी करत आहे. एनसीबी फ्रेम करण्याचं काम करत आहे. एनसीबी फर्जिवाडा करत आहे, असंही मलिक यांनी सांगितलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI