Nawab Malik | काँग्रेसशिवाय देशातील विरोधकांची मोट बांधणं अशक्य, नेतृत्व सामूहिक असेल : नवाब मलिक

काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांची मोठी आघाडी निर्माण करण्याचं काम देशात होईल, त्याचं नेतृत्व कोण करेल आता तो विषय नाही. सामुहिक नेतृत्व असेल, असं नवाब मलिक म्हणाले. काँग्रेसशिवाय विरोधकांची एकजुट शक्य नाही. ममता दिदींचंही तेच म्हणनं असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी काँग्रेस बाबात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधीपासून स्पष्ट भूमिका घेतल्याचं सांगितलं आहे. काँग्रेस शिवाय देशातील विरोधी पक्षांची मोट बांधण अशक्य आहे, असं मत शरद पवारांचं असल्याचं नवाब मलिक म्हणाले. काँग्रेससह नॅान युपीएच्या खासदारांची संख्या 150 आहे, यांना पण सोबत आणणे गरजेचं आहे, असं नवाब मलिक म्हणाले. काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांची मोठी आघाडी निर्माण करण्याचं काम देशात होईल, त्याचं नेतृत्व कोण करेल आता तो विषय नाही. सामुहिक नेतृत्व असेल, असं नवाब मलिक म्हणाले. काँग्रेसशिवाय विरोधकांची एकजुट शक्य नाही. ममता दिदींचंही तेच म्हणनं असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI