Sunetra Pawar | निवडणूक आयोगाकडून NCP ला तातडीचे निर्देश; 26 फेब्रुवारीच्या बैठकीत घडलं ते…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा लक्ष केंद्रित केले आहे. पक्षातील काही महत्त्वाच्या घडामोडींनंतर आता आयोगाने पक्षाकडून आवश्यक कागदपत्रांची मागणी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या राजकारणात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.

26 फेब्रुवारीला झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या संविधानातील काही कलमांमध्ये बदल करण्याला मंजुरी देण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. यामध्ये कलम 6, 7, 12, 32 आणि 36 यांचा समावेश आहे. मात्र, या दुरुस्त्यांना मंजुरी देणारे पत्र किंवा संबंधित प्रस्ताव आयोगाला प्राप्त झाले नसल्याचे निवडणूक आयोगाने पक्षाला पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.
त्यामुळे या बदलांना समर्थन देणारी वैध कागदपत्रे आणि प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. दरम्यान, पक्षाच्या नेतृत्वात झालेल्या बदलांनंतर आयोगाकडून आलेल्या या पत्रामुळे राजकीय चर्चांना वेग आला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून आयोगाला कोणती कागदपत्रे सादर केली जातात आणि त्यावर आयोग काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Aug 03, 2026 06:05 PM
26 फेब्रुवारीच्या बैठकीत घडलं ते... निवडणूक आयोगाकडून NCP ला तातडीचे न
उद्धव ठाकरेंना आणखी मोठा हादरा! विश्वासू महिला नेत्याच्या राजीनाम्यानं
ट्रेकिंगचा थरार ठरला जीवघेणा! दरीत पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
मोठी बातमी! Gen Z बाबत सरसंघचालक मोहन भागवत यांचा मोठा निर्णय; मुंबईत