गटातटांनी राष्ट्रवादीला पोखरलं… थेट सुनेत्रा पवार मैदानात उतरणार; पक्षांतर्गत वाद मिटवण्यात यश येणार?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत नाराजी आणि मतभेद वाढल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीच्या पार्श्वभूमीवर काही आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याची माहिती समोर आली आहे. पक्षात वेगवेगळे गट सक्रिय झाल्याचंही बोललं जात आहे.दरम्यान तटकरे-पटेलांनी शरद पवारांचीही भेट घेतल्याचं सांगितलं जात होतं. आता या प्रकरणात सुनेत्रा पवारांनी पुढाकार घेतला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, काही नेते आणि आमदार हे वरिष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रुफुल्ल पटेल यांच्या भूमिकेच्या समर्थनात आहेत. तर दुसरीकडे काही आमदार पार्थ पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बाजूने असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्षात दोन वेगवेगळे गट पडल्याचं चित्र दिसत आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे आता या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी या आठवड्यात कोअर कमिटीची बैठक बोलावल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे.
एकूणच पक्षातील गैरसमज आणि मतभेद दूर करण्यासाठी स्वतः सुनेत्रा पवार मैदानात उतरल्याचं दिसत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राष्ट्रवादीत आणखी कोणत्या राजकीय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Published on: May 18, 2026 11:12 AM
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात; पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता