मुंबई: राज्यातील नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेचे निकाल हाती आले आहेत. राष्ट्रवादी सर्वाधिक नगर पंचायती जिंकत नंबर वन पक्ष ठरला आहे. विशेष म्हणजे गेल्या राज्याचं मुख्यमंत्रीपद आपल्याकडे असूनही शिवसेनेला आपला दबदबा निर्माण करता आलेला नाही. विदर्भात तर शिवसेनेला काही ठिकाणी खातेही खोलता आले नाही. त्यामुळे शिवसेना हळूहळू अंकूचन पावतेय का? भाजपला आगामी काळात राज्यात संधी आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे. दिवस संपेल तसे काही ठिकाणाचे निकाल अधिक स्पष्ट होताना दिसत आहे, यामध्ये राष्ट्रवादीचा दबदबा असल्याचे दिसून येत आहे. राज्यात काँग्रेसचीही कामगिरी चांगली राहिली आहे. मात्र मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे असूनही सेना पिछाडीवर का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.