AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित शाह यांच्याबरोबर गुप्त भेट झाली? जयंत पाटील आपल्या भूमिकेवर ठाम, स्पष्टच म्हणाले...

अमित शाह यांच्याबरोबर गुप्त भेट झाली? जयंत पाटील आपल्या भूमिकेवर ठाम, स्पष्टच म्हणाले…

| Updated on: Aug 07, 2023 | 8:48 AM
Share

VIDEO | अमित शाह आणि जयंत पाटील यांच्यात तासभर खलबतं, लवकरच भाजपमध्ये जाणार?  अमित शाह आणि जयंत पाटील यांच्यातील भेटीच्या चर्चांवर स्वत: जयंत पाटील म्हणतात....

मुंबई, ७ ऑगस्ट २०२३ | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात गुप्त भेट झाल्याची जोरदार चर्चा सुरू होती. या होणाऱ्या चर्चांवर स्वत: जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. अमित शाह यांची भेट घेतली असल्याच्या फक्त वावड्या असल्याचे म्हणत माझी कुणाशीही भेट झाली नाही. भेट झाल्याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे? असा सवाल करतानाच मी काल, आज आणि उद्या शरद पवार यांच्यासोबतच आहे.’ तर माझ्याबाबतच्या चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. मी कुणालाही भेटलो नाही. कुणाशाही माझा संपर्क झालेला नाही. अशा बातम्या पेरून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. मी कुठेही जाणार नाही. मी शेवटपर्यंत शरद पवार यांच्यासोबतच राहणार आहे, अशी स्पष्ट भूमिका घेत जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याबद्दल गैरसमज पसवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हणत जयंत पाटील यांनी सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

Published on: Aug 07, 2023 08:48 AM