Shara Pawar : शरद पवार यांनी OBC सर्टिफिकेट घेतलं की नाही? जातीचा दाखला व्हायरल
शरद पवार यांचा जातीचा दाखला सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होतोय. शरद पवार यांचे समर्थक विकास पासलकर यांनी मोठा दावा केला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, शरद पवार यांचं सोशल मीडियावर व्हायरल होणारा जातीचा दाखला हा खोटा असून शरद पवार यांनी ओबीसी सर्टिफिकेट घेतलं नसल्याचेही त्यांनी म्हटलंय
मुंबई, १२ नोव्हेंबर २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा जातीचा दाखला सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या जातीच्या दाखल्यावरून अनेक चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच हा दाखला खरा की खोटा? असा सवाल उपस्थित केला जात होता. अशातच शरद पवार यांचे समर्थक विकास पासलकर यांनी मोठा दावा केला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, शरद पवार यांचं सोशल मीडियावर व्हायरल होणारा जातीचा दाखला हा खोटा असून शरद पवार यांनी ओबीसी सर्टिफिकेट घेतल नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तर आज राजकीय वर्तुळातील मोठ्या नेत्याला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचलं जातंय. हे षडयंत्र चुकीचे आहे. राज्यातील अशा षडयंत्र रचणारी लोकं आहेत. त्यांना रसद पुरविली जात आहे. नागपूर सेंटरकडून हे घडत असल्याचे म्हणत त्यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
Published on: Nov 12, 2023 11:58 AM
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
