AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच, अमोल कोल्हे, धनंजय मुंडे यांनी केला निर्धार

“पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच,” अमोल कोल्हे, धनंजय मुंडे यांनी केला निर्धार

apeksha sakpal
apeksha sakpal | Updated on: Jun 22, 2023 | 10:00 AM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापनदिन काल मुंबईत साजरा झाला. या कार्यक्रमातून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधीत केले. राष्ट्रवादीच्या या कार्यक्रमातून पक्षाच्या नेत्यांनी पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच करायचा असा निर्धार केला आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापनदिन काल मुंबईत साजरा झाला. या कार्यक्रमातून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. राष्ट्रवादीच्या या कार्यक्रमातून पक्षाच्या नेत्यांनी पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच करायचा असा निर्धार केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे आणि धनंजय मुंडे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अमोल कोल्हे यांनी “पुढचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच असला पाहिजे यासाठी आतापासूनच कंबर कसूया”, असं वक्तव्य केलं आहे. तर आमदार धनंजय मुंडे म्हणाले की, “येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्रात नंबर एकचा पक्ष झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा झाला पाहिजे यासाठी संकल्प करूया.”  राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या या विधानानंतर आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

 

 

 

Published on: Jun 22, 2023 09:59 AM

Follow Us
Jayant Patil: जयंत पाटील राज्याचे नवीन अर्थमंत्री? शिंदेंच्या बंगल्यावर काय घडले? मोठी घडामोड काय?.

Jayant Patil: जयंत पाटील राज्याचे नवीन अर्थमंत्री? शिंदेंच्या बंगल्यावर काय घडले? मोठी घडामोड काय?

ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांचे फोटो एकाच बॅनरवर, विविध चर्चांना उधाण, धाराशिवमध्ये...

ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांचे फोटो एकाच बॅनरवर, विविध चर्चांना उधाण, धाराशिवमध्ये..

Hasan Mushrif :  ‘असं करून चालणार नाही’, अर्थखातं राष्ट्रवादी द्यायला शिवसेनेचा विरोध, त्यावर हसन मुश्रीफ यांची स्पष्ट भूमिका.

Hasan Mushrif : ‘असं करून चालणार नाही’, अर्थखातं राष्ट्रवादी द्यायला शिवसेनेचा विरोध, त्यावर हसन मुश्रीफ यांची स्पष्ट भूमिका

श्वेता तिवारी म्हणजे संसार मोडणारी बाई…, भाजप खासदाराच्या पहिल्या पत्नीचा संशय, अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपच्या चर्चा अन्….

श्वेता तिवारी म्हणजे संसार मोडणारी बाई…, भाजप खासदाराच्या पहिल्या पत्नीचा संशय, अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपच्या चर्चा अन्…

मोठी बातमी! अर्थखात्यावरून घमासान सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दाैरा रद्द, अचानक...

मोठी बातमी! अर्थखात्यावरून घमासान सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दाैरा रद्द, अचानक..

Eknath Shinde Shivsena : जयंत पाटील काय करतील ते लवकरच कळेल, शिंदे शिवसेनेच्या बड्या नेत्याचं सूचक वक्तव्य.

Eknath Shinde Shivsena : जयंत पाटील काय करतील ते लवकरच कळेल, शिंदे शिवसेनेच्या बड्या नेत्याचं सूचक वक्तव्य