Jitendra Awhad Video : ‘भाई, केम छो, आता फक्त ढोकला, जिलेबी अन् फापडा…’, विधानभवन परिसरात आव्हाडांचं गुजराती, कोणाला डिवचलं?
विधानभनवाच्या परिसरात शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुजराती भाषेत संवाद साधल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या प्रवीण दरेकर यांच्याशी गुजराती भाषेत बोलत जितेंद्र आव्हाड यांनी भाजपलाच डिवचलं आहे.
राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. यावेळी विधानभनवाच्या परिसरात शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुजराती भाषेत संवाद साधल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या प्रवीण दरेकर यांच्याशी गुजराती भाषेत बोलत जितेंद्र आव्हाड यांनी भाजपलाच डिवचलं आहे. तर आदित्य ठाकरे यांच्याशीही जितेंद्र आव्हाड यांनी गुजरातीत संवाद साधत आता मराठीत बोलायचं नाही तर केम छो म्हणायचं असं आव्हाड म्हणाले.
जितेंद्र आव्हाड गुजरातीत का बोलले?
मुंबईची भाषा ही मराठी नसल्याचे वक्तव्य मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माजी सहकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केल्याचे पाहायला मिळाले. “मुंबईची कुठलीही एक भाषा नाही. मुंबईच्या अनेक भाषा आहेत. वेगवेगळ्या परिसरात विविध भाषा बोलल्या जातात. घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. तर गिरगावात हिंदी बोलणारे कमी आहेत. तिथे तुम्हाला मराठी भाषा बोलणारे लोक आढळतील. मुंबईत येणार्या व्यक्तीने मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही.” असे वक्तव्य भैय्याजी यांनी केल्यानंतर राज्यभरात वाद उफाळल्याचे पाहायला मिळत आहे.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
