Rohit Pawar यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला; अन् म्हणाले, ‘आता धीर द्याल ही माफक अपेक्षा’
VIDEO | अतिशय व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 31 दहीहंड्यांना भेट दिली आणि गोविंदांचा उत्साह वाढवला, त्यावरून रोहित पवार यांनी नेमका काय लगावला टोला?
मुंबई, ८ सप्टेंबर २०२३ | ‘दहीहंडीला हजेरी लावली, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता शेतकऱ्यांना धीर द्यावा’, असा खोचक टोला रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. ‘राज्यात दुष्काळाने शेतकरी होरपळला असून यंदाचा कोरडवाहू खरीप हंगाम जवळपास पूर्णत: वाया गेला आहे, कदाचित आज उद्या पाऊस पडेलही परंतु झालेले नुकसान भरून निघणार नाही. त्यामुळे शेतकरी प्रचंड हवालदिल आहे. दुसरीकडे मराठा, धनगर आरक्षणसंदर्भात राज्यात वेगवेगळ्या भागात आंदोलने सुरु आहेत. अशा सर्व स्थितीत मुख्यमंत्री आपण वेळात वेळ काढून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन शेतकऱ्यांना तसेच आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांना देखील धीर द्याल ही माफक अपेक्षा.’ असे रोहित पवार यांनी ट्वीट करत निशाणा साधला आहे.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा

