‘दोन्ही पवारांनी भविष्य़ात एकत्रित यावं कारण…’,रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य
अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन्ही गटाने अर्थात राष्ट्रवादीने एकत्र येण्याची गरज आहे, मूठ घट्ट राहिली पाहिजे, असं वक्तव्य शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी केलं आहे.
दोन्ही पवारांनी भविष्य़ात एकत्रित यावं कारण मूठ घट्ट असेल तर ताकद घट्ट राहते, असं शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या आईनं म्हटलं आहे. अजित पवार हे वाढदिवसानिमित्त शरद पवारांना भेटल्यानंतर आता पवार कुटूंबातूनच दोन्ही पवारांना एकत्र आणण्यासाठी तयारी सुरू झाल्याची चर्चा सध्या होतेय. शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्रित यावं असं रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी गौतम आदानी यांच्याकडे बोट दाखवत तेच मध्यस्थ असल्याचे म्हटलं आहे. पण अजित पवार यांच्या सोबत जाणं म्हणजे भाजपसोबत जाण्यासारखं आहे. मात्र शरद पवार कधीच भाजपसोबत जाणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेने आम्हाला कोणतीच अडचण नसल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपमध्ये गेल्यानंतर अजित पवार यांच्याकडून बऱ्याचदा एकत्र येण्याचे फायदे झालेत. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत संबंध ताणले गेल्यानंतर पुन्हा शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांनी त्यांची भेट घेतली. दरम्यान, दोन्ही पवारांनी एकत्र यावं असं दोन्ही कडच्या नेत्यांना वाटते. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
Published on: Dec 14, 2024 09:55 AM
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
