NCP : अजितदादांचा आमदार त्यांचंच ऐकेना… संग्राम जगतापांची पक्षाच्या विचारधारेशी फारकत अन् होतेय राजीनाम्याची मागणी
संग्राम जगताप यांनी पक्षाच्या विचारधारेशी फारकत घेतली. त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी इंद्रीस नायकवाडी यांनी केली आहे. आणि त्यावर हिंदुत्ववादी भूमिका घेणाऱ्या संग्राम जगतापाणी सुद्धा उत्तर दिले आहे. त्यामुळे पुरोगामीत्वाचा विचार सांगणाऱ्या दादांच्या राष्ट्रवादीमधून आता हा नवा संग्राम समोर आलाय.
आमदार संग्राम जगतापाच्या समर्थनार्थ हिंदू सभेचे आयोजन करण्यात आले. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वसा आणि वारसा सांगणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे हे आमदार आहेत. संग्राम जगताप यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतल्यानंतर पक्षामधूनच त्यांना विरोध होतोय. संग्राम जगतापांनी पक्षाच्या विचारधारेशी फारकत घेतली आहे. त्यामुळे नैतिकता म्हणून त्यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची मागणी इद्रीस नायकवाडी यांनी केली. तर नायकवाडींना माझा राग पण औरंगजेब प्रेमींवर मौन असल्याचं म्हणत संग्राम जगताप यांनी निशाणा साधलाय. मात्र आमदार संग्राम जगताप यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेला समर्थन देण्यासाठी रविवारी अहिल्या नगरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने समर्थन सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. या सभेसाठी सुजय विखे पाटील, संग्राम बापू, राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग, गोरक्षक शिवशंकर स्वामी उपस्थित होते. मातासाठी लाचार होणं हे संग्रामच्या आणि आमच्या रक्तात नाही असं म्हणत सुजय विखेनी संग्राम जगताप यांची बाजू घेतली.