Rohini Khadse : इतकं भंपकपणा बरा नव्हे, बस कर पगली… चित्रा वाघ यांच्या ‘त्या’ कवितेवरून रोहिणी खडसेंचा पलटवार
राजकारणातील भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्यातील वार-पलटवार कित्येकदा समोर आले आहे. अशातच ठाकरेंवर टिका केल्यानंतर रोहिणी खडसेंनी पलटवार केलाय.
सामनात छापला इंग्रजीत मथळा करून ठेवा फ्रेम… अशांना कधीच जाग येत नसते, जे घेतात झोपेचं सोंग, ओळखा पाहू कोण? असं म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कवितेतून उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केल्याचे पाहायला मिळाले होते. पहिलीपासून हिंदी सक्तीचा जीआर सरकारने रद्द केल्यानंतर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरेंवर कविता करून निशाणा साधला आहे. दरम्यान यावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘कशासाठी आमदार व्हायचं असतं… काय करू लागली… जनतेचे प्रश्न सोडून, कविता करू लागली…ऐकून कविता यांची जनता आता हसू लागली.. इतकं भंपकपणा बरा नव्हे ! बस कर पगली…’, असं खोचकपणे पलटवार करत रोहिणी खडसेंनी टोला लगावला आहे.
कशासाठी आमदार व्हायचं असतं
काय करू लागली..जनतेचे प्रश्न सोडून, कविता करू लागली..
ऐकून कविता यांची जनता आता हसू लागली..
इतकं भंपकपणा बरा नव्हे !
बस कर पगली… https://t.co/a8VH5tTDua— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) June 30, 2025

हम करे सो कायदा हे.. ; निलेश लंके सरकारवर संतापले

राड्यानंतर राहुल नर्वेकरांचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर

ना हनी, ना ट्रॅप..; हनीट्रॅपवर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया

सगळे आमदार माजले... फडणवीसांनी भर सभागृहात कोणाला फटकारलं?
