Sanjay Pawar : संजय पवारांना कार्यकर्त्यांसमोर अश्रू थांबेना, उपनेतेपदाचा राजीनामा अन्…
संजय पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापुरातील सर्किट हाऊस येथे शिवसैनिकांची बैठक झाली. या बैठकीत नाराज शिवसैनिक आणि युवासैनिकांची उपस्थिती पाहायला मिळाली.
कोल्हापूरमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेमध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळत आहे. अशातच पदाधिकाऱ्यांचे नाराजी नाट्य देखील तितकंच रंगत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुखपदी रवीकिरण इंगवले यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, संजय पवार या नव्या जिल्हाप्रमुख निवडीने नाराज असून त्यांनी थेट आपल्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. संजय पवार यांनी इंगवले यांच्या नियुक्तीवर नाराजी व्यक्त केली आहे. संजय पवार यांनी उपनेतेपद आणि आपल्या सभासद पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर कोल्हापुरात ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकच गोंधळ पाहायला मिळाला. संजय पवारांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला अन् कार्यकर्त्यांनीही राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. तर दुसरीकडे संजय पवारांच्या मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र यावेळी कार्यकर्त्यांसमोरच संजय पवार यांना अश्रू अनावर झाले.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

