Sharad Pawar : जगाला माहिती आहे…, व्हायरल होणाऱ्या ‘त्या’ दाखल्यावर शरद पवार यांचं स्पष्टीकरण
जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू असताना शरद पवार यांनी कुणबी प्रमाणपत्र काढल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला होता. मात्र याबाबत शरद पवार यांनी मोठा खुलासा केला आहे. शरद पवार यांनी तो दाखला खोटा असल्याचे सांगितले आहे. तर जगाला माहिती आहे माझी जात कोणती आहे असेही शरद पवार म्हणाले.
बारामती, १४ नोव्हेंबर २०२३ | गेल्या दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांचा ओबीसी दाखला व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र या व्हायरल दाखल्यावर शरद पवार यांनी मोठा खुलासा केला आहे. शरद पवार यांनी तो दाखला खोटा असल्याचे सांगितले आहे. तर जगाला माहिती आहे माझी जात कोणती आहे असेही शरद पवार म्हणाले. ते असेही म्हणाले, ‘माझा दाखला मी बघितला. तो दाखला मी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात होतो. तेव्हाचा तो दाखला आहे. तो दाखला खरा आहे. मात्र काही लोकांनी दुसरा इंग्रजीतील खोटा दाखला सोशल मीडियावर व्हायरल केला. त्या व्हायरल होणाऱ्या दाखल्यात माझ्या नावासमोर ओबीसी लिहिले आहे. मला ओबीसी समाजाचा आदर आहे. मात्र जन्माने जी प्रत्येकाची जात असते, ती मी लपवू इच्छित नाही. त्यामुळे संपूर्ण जगाला माहिती आहे की, माझी जात कोणती आहे. ‘
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

