AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navi Mumbai | महागाईविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा एल्गार! नवी मुंबईत रस्त्यावर उतरले दिग्गज नेते

Navi Mumbai | महागाईविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा एल्गार! नवी मुंबईत रस्त्यावर उतरले दिग्गज नेते

| Updated on: Jun 03, 2026 | 11:16 AM
Share

महागाई, इंधन दरवाढ आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झाला असून नवी मुंबईत पक्षाकडून मोठे आंदोलन करण्यात येत आहे. जनविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

महागाई, इंधन दरवाढ आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झाला असून नवी मुंबईत पक्षाकडून मोठे आंदोलन करण्यात येत आहे. जनविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील आणि रोहित पवार उपस्थित असून पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे देखील आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांकडून महागाईविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.

वाढत्या इंधन दरांमुळे आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन कठीण झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. यावेळी आंदोलनाला अधिक प्रतीकात्मक स्वरूप देण्यासाठी कार्यकर्त्यांनी भांडी वाजवत निषेध व्यक्त केला. तसेच रस्त्यावर चूल पेटवून भाकरी थापत महागाईचा फटका सामान्य नागरिकांना कसा बसत आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा नवी मुंबईत काढण्यात येणार असून सरकारने महागाई नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. या आंदोलनामुळे नवी मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Published on: Jun 03, 2026 11:15 AM

Follow Us
सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : कॉकरोच जनता पार्टीचा धक्कादायक निर्णय, विजेता दहिया यांना प्रवक्तेपदावरून हटवलं, कारण काय?.

CJP Vijeta Dahiya : कॉकरोच जनता पार्टीचा धक्कादायक निर्णय, विजेता दहिया यांना प्रवक्तेपदावरून हटवलं, कारण काय?

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!

देशभरातून स्विगी, झोमॅटोने विद्यार्थ्यांना जंतर मंतरवर जेवण पाठवतायेत लोकं.

देशभरातून स्विगी, झोमॅटोने विद्यार्थ्यांना जंतर मंतरवर जेवण पाठवतायेत लोकं

बिग बॉसचा नवा सिझन Bigg Boss 20 चा ट्रेलर लाँच, होस्ट सलमान खान असणार की नाही ? उत्सुकता शिगेला….

बिग बॉसचा नवा सिझन Bigg Boss 20 चा ट्रेलर लाँच, होस्ट सलमान खान असणार की नाही ? उत्सुकता शिगेला…