Supriya Sule : …म्हणून संभाव्य उमेदवारांचा पत्ताच गुल.. मतदार यादीत घोळावरून सुप्रिया सुळे यांचा गंभीर आरोप
सुप्रिया सुळेंनी मतदार यादीतील मोठ्या घोळाचा पर्दाफाश केला आहे, ज्यात संभाव्य उमेदवारांना निवडणूक लढवण्यापासून रोखण्यासाठी त्यांचे पत्ते बदलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पिंपरी-चिंचवडमधील एका कुटुंबाचे मतदान इच्छेशिवाय दुसरीकडे हलवण्यात आल्याचे उदाहरण त्यांनी दिले. निवडणुकीत जिंकण्यासाठी हा नवीन प्रकार वापरला जात असल्याचा संशय सुळेंनी व्यक्त केला आहे.
सुप्रिया सुळे यांनी मतदार यादीतील गंभीर अनियमितता समोर आणली आहे. संभाव्य उमेदवारांना निवडणूक लढण्यापासून रोखण्यासाठी त्यांचा पत्ता जाणूनबुजून बदलला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नवऱ्याचे नाव इंदापूरमध्ये आणि बायकोचे नाव बारामतीमध्ये अशा प्रकारच्या चुका यादीत आढळल्याने अनेकजण निवडणूक लढण्यास अपात्र ठरतील, असे सुळे यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड युवक अध्यक्ष इमरान शेख आणि त्यांच्या कुटुंबीयांचे उदाहरण सुळे यांनी दिले. पिंपरी-चिंचवडमध्ये ३५ वर्षांपासून राहणाऱ्या या कुटुंबाचे मतदान, त्यांची कोणतीही मागणी नसताना, शहराबाहेर टाकण्यात आले आहे. इमरान यांच्या आई रबिया शेख यांचे मतदान शिरसफळ येथे, तर वडील युनूस शेख यांचे मतदान इंदापूर येथील मतदार यादीत टाकण्यात आले. रबिया शेख प्रभाग क्रमांक नऊमधून तर युनूस शेख आठमधून इच्छुक होते. निवडणुका जिंकण्यासाठी संभाव्य उमेदवारांचा पत्ताच गुल करण्याचा हा एक नवा प्रकार असावा, अशी शंका सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्वीटमध्ये व्यक्त केली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

