Pune: एनडीए 142वा दीक्षांत समारंभ संपन्न ; आर्मीत जायचे पक्के, सेवेत जाता येत असल्याचा आनंद
तीन वर्षांतला अनुभव चांगला होता. खूप काही शिकता आले. आर्मीत जायचे आधीपासूनच ठरले होते. त्यामुळे सेवेत जाता येत असल्याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया या तिघांनी दिली
पुणे – पुण्यातील खडकवासला येथील एनडीएमध्ये(NDA) 142वा दीक्षांत समारंभ पार पडला यामध्ये अभिमन्यू चौधरी याने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर गोल्ड मेडल प्राप्त केले तर अरविंद चव्हाण याला सिल्व्हर मेडल मिळाले. नितीन शर्मा याला ब्राँझ मेडल प्रदान करण्यात आले तीन वर्षांतला अनुभव चांगला होता. खूप काही शिकता आले. आर्मीत (Army)जायचे आधीपासूनच ठरले होते. त्यामुळे सेवेत जाता येत असल्याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया या तिघांनी दिली. या समारंभाला एअर मार्शल चिफ विवेक चौधरी यांनी हजेरी लावली होती. त्यांच्यासह एनडीएचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल अजय कोचर, मुख्य प्रशिक्षक मेजर जनरल संजीव डोग्रा, लेफ्टनंट जनरल जे. ए. नैन आदी उपस्थित होते. विवेक चौधरी यांनी सर्व कॅडेट्सचे (Cadets) कौतुक करत पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा

