पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स…
NEET-UG परीक्षेतील पेपर लीक प्रकरणानंतर शिक्षण मंत्रालय आणि National Testing Agency म्हणजेच NTA आता 21 जून रोजी होणाऱ्या Re-exam साठी अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था लागू करत आहे. यावेळी प्रश्नपत्रिका तयार करणारे, त्याचे मॉडरेशन करणारे आणि विविध भाषांमध्ये भाषांतर करणाऱ्या तज्ज्ञांबाबत खास आराखडा तयार करण्यता आला आहे.
NEET-UG परीक्षेतील पेपर लीक प्रकरणानंतर शिक्षण मंत्रालय आणि National Testing Agency म्हणजेच NTA आता 21 जून रोजी होणाऱ्या Re-exam साठी अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था लागू करत आहे. यावेळी प्रश्नपत्रिका तयार करणारे, त्याचे मॉडरेशन करणारे आणि विविध भाषांमध्ये भाषांतर करणारे तज्ज्ञ गुप्त ठिकाणी पूर्णपणे लॉकडाउनमध्ये ठेवण्यात आले आहेत. परीक्षा संपेपर्यंत त्यांना बाहेरील कोणाशीही संपर्क ठेवण्यास परवानगी नसणार आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या ठिकाणी मोबाईल फोन, लॅपटॉप, इंटरनेट आणि स्मार्टवॉच यांवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. प्रश्नपत्रिका लीक होऊ नये यासाठी संपूर्ण प्रक्रिया अनेक टप्प्यांमध्ये विभागण्यात आली आहे. कोणत्याही एका व्यक्तीकडे संपूर्ण माहिती किंवा नियंत्रण नसणार आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रश्नपत्रिका सुरक्षितपणे परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या म्हणजेच IAF च्या विमानांची मदत घेतली जाणार आहे. यामुळे 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या परीक्षेची गोपनीयता राखण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Published on: Jun 08, 2026 12:51 PM
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे..
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच..
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा

