Sharad Pawar | काही लोकं गेले म्हणून नवीन नेतृत्त्व तयार झालं : शरद पवार

राष्ट्रवादी हा पक्ष 15 वर्षे सत्तेत होता. नंतर काही काळासाठी नव्हता. या काळात काही लोक पक्ष सोडून गेले. काही लोक गेले म्हणून नवे लोक तयार झाले. नवं नेतृत्व तयार झालं, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक वैशिष्य आहे. सहकाऱ्यांच्या कष्टाने, जनतेबद्दलच्या बांधिकलीमुळे आपण जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी यशस्वी होत आहोत. राष्ट्रवादी हा पक्ष 15 वर्षे सत्तेत होता. नंतर काही काळासाठी नव्हता. या काळात काही लोक पक्ष सोडून गेले. काही लोक गेले म्हणून नवे लोक तयार झाले. नवं नेतृत्व तयार झालं, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादीचा आज 22 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI