55 लाख नव्हे 5 लाख, ती टाईपिंग मिस्टेक, ईडीचा युक्तिवाद म्हणजे सुडाचं राजकारण : निलेश भोसले
हे संपूर्ण आरोप आहेत ते राजकीय हेतूने झालेले आरोप आहेत. या सर्व आरोपांमुळे राज्यातील एका जबाबदार मंत्राचा बळी गेलेला आहे, असं नवाब मलिक यांचे वकील निलेश भोसले म्हणाले आहेत.
नवाब मलिक यांच्या वतीने आज कोर्टात ऍड अमित देसाई यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूने युक्तिवाद झाला आणि नवाब मालिक यांना 7 मार्च पर्यंत ईडी ची कस्टडी देण्यात आलेली आहे. नवाब मलिक यांना काही आरोग्यविषयक कारणांमुळे जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल होतं त्यामुळे त्यांचा जबाब पूर्ण नोंदवला गेला नसल्याचा युक्तिवाद ईडीच्या वकिलांकडून करण्यात आला. त्यामुळे कोर्टाने 7 मार्च पर्यंत इडी कस्टडी देण्यात आलेली आहे. परंतु, 55 लाख रुपये रोख पद्धतीने हसीना पारकर यांना देण्यात आल्याचा आरोप इडीकडून आरोप पत्रात करण्यात आला होता. पण त्यात चुकून टायपिंग मिस्टेक झालेली आहे आणि तो व्यवहार 55 लाखांचा झाला नसून फक्त 5 लाखांचा झालेला आहे असं आज कोर्टात सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे हे संपूर्ण आरोप आहेत ते राजकीय हेतूने झालेले आरोप आहेत. या सर्व आरोपांमुळे राज्यातील एका जबाबदार मंत्राचा बळी गेलेला आहे, असं नवाब मलिक यांचे वकील निलेश भोसले म्हणाले आहेत.
Latest Videos
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?

