Sushma Andhare : दुबे ला तुडवायचं का, हे.. ; निशिकांत दुबेंच्या ‘त्या’ विधानावर अंधारे भडकल्या
Sushma Andhare on Nishikant Dubey : भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या टीकेवर सुषमा अंधारे यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.
हिंदी आणि मराठी असा भाषा वाद सुरू असल्याचे पाहायला मिळत असून हा भाषा वाद काही संपायचं नाव घेत नाहीये. अशातच भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्रात हिंदी भाषिकांवर हल्ला करणाऱ्यांना उघड आव्हान दिले आहे. त्यावर आता सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली असून दुबे यांच्यावर टीका केली आहे.
महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या वादावर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. त्यांनी हिंदी भाषिकांना लक्ष्य करणाऱ्यांना थेट आव्हान देत म्हटले, मुंबईत हिंदी भाषिकांवर हल्ला करणाऱ्यांनो, हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांवर हल्ला करून दाखवा. आपल्या घरात तर कुत्रासुद्धा वाघ बनतो. आता कोण कुत्रा आणि कोण वाघ, हे तुम्हीच ठरवा. या वक्तव्यावर शिवसेना उबाठा नेत्या सुषमा अंधारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..

