VIDEO : Nitesh Rane | आर्यन खान प्रकरणावरुन नितेश राणेंची नवाब मलिकांवर टीका

मुंबई ड्रग्स प्रकरणाला आता राजकीय वळण लागलं आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. प्रभाकर साईल यांच्या व्हिडीओनं मोठी खळबळ उडाल्यानंतर आता वानखेडे यांच्या जन्मदाखल्याबाबत मलिकांनी केलेल्या खुलास्यानंतर शिवसेनेच खासदार संजय राऊतही आक्रमक झाले आहेत.

मुंबई ड्रग्स प्रकरणाला आता राजकीय वळण लागलं आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. प्रभाकर साईल यांच्या व्हिडीओनं मोठी खळबळ उडाल्यानंतर आता वानखेडे यांच्या जन्मदाखल्याबाबत मलिकांनी केलेल्या खुलास्यानंतर शिवसेनेच खासदार संजय राऊतही आक्रमक झाले आहेत. इंटरव्हलपर्यंत नवाब मलिकांनी सांगितलं, आता इंटरव्हलनंतर मी बोलणार, असं सूचक वक्तव्य राऊत यांनी केलं होतं. आता आर्यन खान प्रकरणावरुन नितेश राणेंची नवाब मलिकांवर टीका केली आहे. संजय राऊत काल असं बोलले की इंटरव्हलपर्यंत नवाब मलिक आहेत. इंटरव्हलनंतर मी बोलणार. तर त्यांना मी सांगतो की क्लायमेक्स मी करणार, असा सूचक आणि थेट इशाराच नितेश राणे यांनी राऊतांना दिलाय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI