काम खराब झालं तर मी पब्लिकली सांगण्याचं काम करतो, कारण… Nitin Gadkari यांचं विधान

बुटीबोरी नगरपरिषद दत्तक घेण्याचा निर्णय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज जाहीर केला. बुटीबोरी शहराचा सर्वांगीण विकास आणि हरित शहर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं. नागपूर शेजारी असलेल्या बुटीबोरीची औद्योगिक शहर म्हणून सर्वत्र ख्याती आहे.

बुटीबोरी नगरपरिषद दत्तक घेण्याचा निर्णय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज जाहीर केला. बुटीबोरी शहराचा सर्वांगीण विकास आणि हरित शहर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं. नागपूर शेजारी असलेल्या बुटीबोरीची औद्योगिक शहर म्हणून सर्वत्र ख्याती आहे. गडकरींनी बुटीबोरी उड्डाणपुलाचे आजच लोकार्पण केले. या पुलामुळे वर्धा, हैद्राबाद आणि चंद्रपूरकडे जाणारी वाहतूक सुरळीत आणि जलद होणार आहे. यापूर्वी नितीन गडकरी यांनी गावं दत्तक घेतली आहेत, पण पहिल्यांदाच त्यांनी नगरपरिषद दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. ‘बुटीबोरीच्या विकासासाठी आपण कटीबद्ध आहोत’ अशी ग्वाही गडकरींनी यावेळी बुटीबोरीवासियांना दिली. बुटीबोरी नगरपरिषद दत्तक घेतल्याबद्दल नगराध्यक्ष बबलू गौतम यांनी नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त केले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI