Nitin Gadkari | नाना पटोलेंची भाषा आक्षेपार्ह आणि निंदनीय, पोलिसांनी त्यांना अटक करावी : नितीन गडकरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह व निंदनीय आहे. पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी,अशी मागणी नितीन गडकरी यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Jan 18, 2022 | 9:09 AM

नितीन गडकरी यांनी देखील नाना पटोले यांच्या विषयी आक्रमक भूमिका घेतलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह व निंदनीय आहे. पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी,अशी मागणी नितीन गडकरी यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यामुळं भाजप आक्रमक झाली आहे. नाना पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यांच्या बद्दल वापरलेली भाषा आक्षेपार्ह असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भाजपकडून आज राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें