AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aryan Khan ड्रग्ज प्रकरण; NCB च्या SIT च्या तपासात माहिती आली समोर

| Edited By: | Updated on: Mar 02, 2022 | 10:51 AM
Share

अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) हा अमली पदार्थांच्या मोठ्या कटाचा किंवा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी रॅकेटचा भाग होता याचा कोणताही पुरावा नाही, असं अमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या (NCB) विशेष तपास पथकाला (SIT) आढळून आलं आहे.

अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) हा अमली पदार्थांच्या मोठ्या कटाचा किंवा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी रॅकेटचा भाग होता याचा कोणताही पुरावा नाही, असं अमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या (NCB) विशेष तपास पथकाला (SIT) आढळून आलं आहे. एनसीबीच्या मुंबई विभागाने केलेल्या आरोपांच्या विरोधात एसआयटीचे काही महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत. आर्यन खानकडे ड्रग्ज आढळलेच नव्हते, त्यामुळे त्याचा फोन घेऊन त्याचे चॅट्स तपासण्याची गरज नव्हती. चॅट्स असे सुचवत नाहीत की आर्यन कोणत्याही आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा भाग होता. NCB मॅन्युअलमध्ये अनिवार्य असूनसुद्धा छाप्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला नव्हता आणि गुन्ह्यात अटक केलेल्या अनेक आरोपींकडून जप्त केलेले ड्रग्ज सिंगल रिकव्हरी म्हणून दाखवले आहेत, असे निष्कर्ष एनसीबीच्या एसआयटीने काढले आहेत.