Shiv Sena : केवळ घोषणाबाजीच नाहीतर शिवसैनिकांचा ‘त्या’ आमदाराच्या ताफ्यावर हल्लाही

आतापर्यंत बंडखोर आमदारांबद्दल वेगवेगळ्या घोषणा दिल्या जात होत्या. सत्ता स्थापन होऊन तीन महिने उलटले तरी शिवसैनिकांचा रोष हा कमी झालेला नाही. अमरावती जिल्ह्यामध्ये एका बंडखोर आमदार समोर घोषणाबाजीच नाही तर ताफ्यावर हल्लाही केला.

राजेंद्र खराडे

|

Sep 25, 2022 | 8:55 PM

अमरावती : बंडखोर आमदारांबाबत (Rebel MLA) आतापर्यंत केवळ रोष आणि घोषणाबाजी केल्या जात होत्या. पण अमरावतीमध्ये (Amravati) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आ. संतोष बांगर (Santosh Bangar) यांचा ताफा अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीमध्ये दाखल होताच संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला चढविला. गाडीच्या काचा वरी घेऊन मार्गस्थ होण्याशिवाय बांगर यांच्याजवळ दुसरा कोणताच पर्याय राहिला नाही. 50 खोके एकदम ओके, गद्दार अशा घोषणा तर शिवसैनिक देत होतेच पण ज्यावेळी संतोष बांगर यांची गाडी अंजनगाव सुर्जीमध्ये दाखल झाली त्यावेळी संतप्त शिवसैनिक थेट गाडीला आडवे गेले. गाडी थांबवली नाहीतर शिवसैनिकांनी गाडीच्या काचावर हाताने मारलेही. त्यामुळे स्थानिक पातळीवर शिवसैनिकांमध्ये किती रोष आहे याचा प्रत्यय आला आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें