Laxman Hake : अन् आंदोलनासाठी लक्ष्मण हाके थेट समुद्रात उतरले
Laxman Hake Protest On Girgaon : लक्ष्मण हाके यांनी आज मुंबईच्या गिरगाव चौपाटी येथे थेट समुद्रात जाऊन आंदोलन सुरू केलं आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर आंदोलन सुरू केलं आहे. महाज्योतीला निधी मिळत नसल्याचा आरोप करत लक्ष्मण हाके यांनी हे आंदोलन सुरू केलं आहे. यासाठी आता हाके थेट समुद्रात उतरलेले दिसून आले आहेत. राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वातावरण आधीच तापलेले असताना, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सरकारच्या धोरणांचा खरपूस समाचार घेत गिरगाव चौपाटीवर जलसमाधी आंदोलन छेडलेलं आहे. महाज्योती योजनेच्या निधीअभावी ओबीसी विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जात आहे, असं म्हणत हाके यांनी थेट समुद्रात उतरून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. हाके यांच्यासह विद्यार्थी व कार्यकर्ते थेट समुद्रात उतरले. “उठ ओबीसी जागा हो, संघर्षाचा धागा हो!” अशा घोषणांनी चौपाटी दणाणून सोडली आहे. दरम्यान, आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून हाके आणि त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेतले.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?

