AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

mumbai pune highway : मुंबई-पुणे महामार्गावर ऑईल टँकर पलटला, मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक कोलमडली

mumbai pune highway : मुंबई-पुणे महामार्गावर ऑईल टँकर पलटला, मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक कोलमडली

| Edited By: | Updated on: Mar 26, 2022 | 11:25 AM
Share

मुंबई-पुणे महामार्गावर ऑईल टँकर पलटल्याची माहिती आहे. यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक कोलमडली आहे. तर याठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. अमृतांजन ब्रीजजवळ टँकर पलटलाय.

मुंबई : मुंबई-पुणे महामार्गावर (mumbai pune highway) ऑईल टँकर (oil tanker) पलटल्याने अपघात झाल्याची माहिती आहे. यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक (traffic) कोलमडली आहे. तर याठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली निर्माण झाली आहे. हामुंबई-पुणे महामार्गावर ऑईल टँकर हा अमृतांजन ब्रीजजवळ टँकर पलटलटल्याची माहिती आहे. ऑईल टँकर पलटल्यावर रस्त्यावरील ऑईलमुळे दुसरा टँकरही पलटल्याची घटना याठिकाणी घडली आहे. यामुळे महामार्गावरुन मुंबईच्या दिशेने जाणारी वातूक कोलमडली आहे. मुंबई-पुणे महामार्गावर अनेक लोक रोज मुंबईच्या दिशने प्रवास करत असतात. या मुंबई-पुणे महामार्गावरवर अनेकदा वाहतूक कोंडी पहायला मिळते. याठिकाणी वाहतूक पोलीसही कार्यरत असतात. मात्र, आज मुंबई-पुणे महामार्गावर ऑईल टँकर पलटल्याने महामार्गावर पडलेल्या ऑईलमुळे दुसरा ट्रकही पलटला आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसून आली.

Published on: Mar 26, 2022 11:23 AM