Nagpur Crime | अजनीमध्ये Star कासवांची तस्करी, वन विभागाने तीन आरोपींना केली अटक

Nagpur Crime | अजनीमध्ये Star कासवांची तस्करी, वन विभागाने तीन आरोपींना केली अटक
नागपूर वनविभागाने कासव तस्करी करणाऱ्या तिघांना अटक केली.
Image Credit source: tv 9

अजनी परिसरात स्टार कासवांची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना वन विभागाने अटक केली. नागपुरातील अजनी परिसरात वन विभागाने ही कारवाई केली. दुर्गेश शुक्ला, शुभम पुलेवार, शिवम अवस्थी या तीन आरोपींना अटक करण्यात आली. स्टार कासव तस्करी प्रकरणात आणखी आरोपी असण्याची शक्यता आहे.

गजानन उमाटे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Mar 26, 2022 | 9:34 AM

नागपूर : शहरातील अजनी या ठिकाणी स्टार कासवांची तस्करी होत असल्याची माहिती वनविभागाला (Forest Department) मिळाली. या माहितीच्या आधारे सापळा रचून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. ती आरोपींकडील मुद्देमालासह त्यांना अटक करण्यात आली. 24 मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली. 6 स्टार प्रजातीचे कासव जप्त करण्यात आले. आरोपींवर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम (Wildlife Act) 1972 च्या विविध कलमांद्वारे वनगुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. नागपुरातील दुर्गेश रामअवध शुक्ला ( वय 34), शुभम कैलास पुलेवार ( वय 25) व शिवम राजकुमार अवस्थी ( वय 21) या तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या तिन्ही आरोपींविरोधात वनगुन्हा (Wildlife) नोंदविला. या प्रकरणात आणखी आरोपी असण्याचा संशय आहे. त्या दिशेने वनविभाग तपास करत आहे.

यांनी केली कारवाई

ही कारवाई मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा, सहाय्यक वनसंरक्षक एन. जी. चांदेवार यांच्या मागदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी बुटीबोरी, एल. व्ही. ठोकळ, वनपरिक्षेत्र अधिकारी, सेमिनरी हिल्स सारिका वैरागडे, नीलेश तवले, महादेव मुंडे, योगेश ताडाम, मारोती मुंडे, किशोर चव्हाण व कल्याणी तिवडे यांनी केली. त्यांना मानद वन्यजीव रक्षक नागपूर, अंजिक्य भटकर, स्वप्निल बोधाने व पीपल्स फॉर अॅनिमल सदस्य अंकित खलोंडे यांनी सहकार्य केले. या प्रकरणाचा तपास सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू व कॅम्पा) सुरेंद्र काळे हे करीत आहेत.

वनकर्मचाऱ्यांपुढे आव्हान

कासव ही दुर्मिळ प्रजाती आहे. यांची विक्री करता येत नाही. तरीही तस्करी करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला. याचा अर्थ तस्करी झुप्या पद्धतीने सुरूच आहे. यावर आळा कसा घालता येईल, यावर वनविभागानं जाळे पसरविणे आवश्यक आहे.

Campaign | क्षयरोग दुरीकरण मोहीम, गुंतवणूक करा व जीव वाचवा; 2025 पर्यंत भारत क्षयरोग मुक्त?

Nagpur Crime | गुटखा, सुगंधी तंबाखूची तस्करी, अन्न व औषध प्रशासन विभागाची धाड, 9 लाखांची तंबाखू जप्त

Uddhav Thackeray | महिनाभर दाऊद एके दाऊदच, सरकारनं काय केलं लक्षच नाही, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर पलटवार

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें