Mumbai | मुंबई विमानतळावर हायरिक्स देशातून येणाऱ्यांसाठी वेगळा कॉरिडॉर
हायरिस्क देशातून आलेली सर्व विमाने टर्मिनलच्या पूर्वेला उतरवण्यात येतील. प्रवाशाने विमानतळावर प्रवेश करताच थर्मल स्कॅनरमधून तापमान मोजले जाईल. त्यानंतर आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी 100 रजिस्ट्रेशन काऊंटर तयार करण्यात आले आहेत.
मुंबई : कोरोना विषाणूचा नवा प्रकार (Corona New Variant) असलेल्या ओमिक्रॉननं (Omicron) राज्यात शिरकाव केलाय. डोंबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आता मुंबईतही ओमिक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग (Health Department) आणि संबंधित यंत्रणांकडून मोठी खबरदारी घेतली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. परदेशातून आलेल्या प्रवाशांना आणि त्यांच्याशी संपर्कात आलेल्या लोकांना ओमिक्रॉनची लागण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता हायरिस्क देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई विमानतळावर वेगळा कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे.
हायरिस्क देशातून आलेली सर्व विमाने टर्मिनलच्या पूर्वेला उतरवण्यात येतील. प्रवाशाने विमानतळावर प्रवेश करताच थर्मल स्कॅनरमधून तापमान मोजले जाईल. त्यानंतर आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी 100 रजिस्ट्रेशन काऊंटर तयार करण्यात आले आहेत. प्रवाशांना कोरोना चाचणीसाठी ताटकळत राहावे लागू नये म्हणून 68 सॅम्पल कलेक्शन बुथ तयार करण्यात आले आहेत. आरटीपीसीआर आणि रॅपीड पीसीआर हे दोन पर्याय प्रवाशांकडे असतील. सॅम्पल कलेक्शननंतर प्रवाशी इमिग्रेशन प्रक्रिया पार पाडू शकतो. दरम्यान, प्रवाशाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यास त्याला 14 दिवस संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येईल. तर रिपोर्ट निगेटीव्ह आल्यास 7 दिवस होम कॉरंटाईन केले जाईल. 7 दिवसानंतर या प्रवाशाची पुन्हा तपासणी केली जाणार आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

