AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Omraje Nimbalkar | इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा डाव; पदाधिकाऱ्यांना...

Omraje Nimbalkar | इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा डाव; पदाधिकाऱ्यांना…

| Updated on: Jun 28, 2026 | 11:59 AM
Share

धाराशिवमध्ये आज मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर आज धाराशिवमध्ये दाखल होणार असून त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील आज धाराशिव दौऱ्यावर आहेत.

धाराशिवमध्ये आज मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर आज धाराशिवमध्ये दाखल होणार असून त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील आज धाराशिव दौऱ्यावर आहेत. ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे धाराशिवमध्ये येत आहेत.

दरम्यान, ओमराजे निंबाळकर यांनी बालाजी तिरुपती आणि शनिशिंगणापूर येथे देवदर्शन केले. त्यानंतर ते धाराशिवकडे रवाना झाले आहेत. मतदारसंघात परतल्यानंतर ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलवलं आहे. त्यामुळे आगामी राजकीय निर्णयाबाबत उत्सुकता वाढली आहे. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरच त्यांनी बैठक घेण्याचं ठरवलं की काय? अशाही चर्चा आहेत.

धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेकडे आणि ओमराजे निंबाळकर यांच्या बैठकीकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. पुढील काही दिवसांत जिल्ह्यात मोठ्या राजकीय हालचाली होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत घडामोडींना आणखी वेग येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Published on: Jun 28, 2026 11:59 AM

Follow Us