Ajit Pawar | बाबांनो कोर्टाची पायरी चढू नका, अजितदादांचा शेतकरी वर्गाला सल्ला
शेतकऱ्यांच्या घराघरातील वादाचं मूळ हे जमीन असल्याचं सांगितलं. त्यामुळे वाद करत बसू नका, तुम्हाला कोर्टात जाईपर्यंत सगळे गोड बोलतील. नंतर त्रास होईल. त्यामुळं कोर्टाची पायरी चढू नका. असा सल्ला अजित पवार यांनी दिलाय.
“सद्यस्थितीत जमीन ही घराघरातील वादाचे मूळ आहे. हे वाद कायमस्वरुपी मिटावेत अशी आमची भूमिका आहे. त्यामुळेच विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. मात्र बाबांनो कोर्टाची पायरी चढू नका” असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. बारामतीत डिजीटल स्वाक्षरीत सातबारा वाटप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या घराघरातील वादाचं मूळ हे जमीन असल्याचं सांगितलं. त्यामुळे वाद करत बसू नका, तुम्हाला कोर्टात जाईपर्यंत सगळे गोड बोलतील. नंतर त्रास होईल. त्यामुळं कोर्टाची पायरी चढू नका. असा सल्ला अजित पवार यांनी दिलाय. आमच्या लहानपणी तलाठी अर्थात भाऊसाहेबांचाच थाट असायचा. त्याकाळी काहींनी कुणाच्याही जमिनी कुणाच्याही नावावर करण्याचे उद्योग केल्याचा किस्सा यावेळी अजित पवार यांनी सांगितला.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?

