AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kirit Somaiya | अपारदर्शकता, सत्तेचा गैरवापर, घोटाळ्याची चौकशी होणार : किरीट सोमय्या

Kirit Somaiya | अपारदर्शकता, सत्तेचा गैरवापर, घोटाळ्याची चौकशी होणार : किरीट सोमय्या

| Edited By: | Updated on: Oct 22, 2021 | 4:53 PM
Share

साखर कारखान्यांवर पडणाऱ्या धाडी आणि त्या निमित्ताने निर्माण झालेल्या प्रश्नावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज उत्तर दिली. कारखान्यांची विक्री आणि खरेदीची लिस्टच त्यांनी सादर केली. मात्र, त्यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खिल्ली उडवली आहे.

साखर कारखान्यांवर पडणाऱ्या धाडी आणि त्या निमित्ताने निर्माण झालेल्या प्रश्नावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज उत्तर दिली. कारखान्यांची विक्री आणि खरेदीची लिस्टच त्यांनी सादर केली. मात्र, त्यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खिल्ली उडवली आहे. पीआर एजन्सीने दिलेली यादी त्यांनी वाचून दाखवलेली दिसते, असा चिमटा काढतानाच दुनिया की सैर करलो. पण मूळ मुद्दा बाजूलाच राहिला आहे, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

किरीट सोमय्या यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. अजितदादांनी त्यांच्या कंपन्या आणि त्यातील गुंतवणुकीवर चिंता व्यक्त केली होती. त्यांच्या बहिणींच्या आर्थिक व्यवहारावरही त्यांनी चिंता व्यक्त केली होती. बिल्डरबरोबरांच्या संबंधावर त्यांनी काहीच भाष्य केलं नाही. स्पार्कलिंक बाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. जरंडेश्वर मिल प्रायव्हेट लिमिटेडच्या विक्रीतून 2009मध्ये 50 कोटी मिळाले होते. या सर्वांना त्यांनी बगल दिली आहे. गुरु कमोडिला कारखाना कसा दिला. कमोडिटीजला कारखाना चालवण्याचा गंधही नव्हता. त्यांचा संबंधही नव्हता. तरीही त्यांना कारखाना कसा विकला? असा सवाल सोमय्यांनी केला आहे.