AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंचा मोठा डाव, अरविंद सावंतांच्या माध्यमातून थेट... दिल्लीत काय घडतंय?

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंचा मोठा डाव, अरविंद सावंतांच्या माध्यमातून थेट… दिल्लीत काय घडतंय?

| Updated on: Jun 17, 2026 | 10:59 AM
Share

सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरलेलं प्रकरण म्हणजे ‘ऑपरेशन टायगर’. शिवसेना (उबाठा) पक्षातील खासदार फुटणार असल्याच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे.

सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरलेलं प्रकरण म्हणजे ‘ऑपरेशन टायगर’. शिवसेना (उबाठा) पक्षातील खासदार फुटणार असल्याच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. रविवारी ‘मातोश्री’ येथे झालेल्या बैठकीला केवळ 5 खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर 4 खासदार ऑनलाइन सहभागी झाले होते, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे गटातील अनेक खासदार दिल्लीला पोहोचल्याने राजकारण तापलं आहे.

दरम्यान, मोठी अपडेट समोर आली आहे. ठाकरे सेनेतील बंड करणारे 6 खासदार दिल्लीला पोहोचले असून त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्यासाठी वेळ घेतली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीला पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी ठाकरे गटातील बंडखोरांच्या भेटीआधीच अरविंद सावंत यांनी अध्यक्षांना पत्र दिल्याचंही सुत्रांनी कळवलं आहे. या पत्रामध्ये अनेक बाबींच्या नोंदी केल्या गेल्या आहेत.

सदर पत्रात ठाकरे सेनेतील अरविंद सावंत यांनी बंडखोरांना गट स्थापना तसेच विलनीकरणास मान्यता न देण्याची मागणी केली आहे, इतकेच नाही तर कुठल्याही निर्णयाआधी आमचं मत विचारात घ्यावं असंही सांगितलं आहे.

Published on: Jun 17, 2026 10:59 AM

Follow Us
तुकाराम मुंडे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई, थेट….

तुकाराम मुंडे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई, थेट…

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी फोडला मोठा बॉम्ब, एका घोषणेनं जगभरात मोठी खळबळ, यादीत भारताचाही समावेश, आता थेट….

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी फोडला मोठा बॉम्ब, एका घोषणेनं जगभरात मोठी खळबळ, यादीत भारताचाही समावेश, आता थेट…

वेस्ट इंडिजच्या मदतीसाठी पुढे सरसावले जय शाह, संघ बांधणीसाठी असं उचललं पाऊल.

वेस्ट इंडिजच्या मदतीसाठी पुढे सरसावले जय शाह, संघ बांधणीसाठी असं उचललं पाऊल

पंढरपुरात व्हिआपी दर्शनावरून दुजाभाव? शिवसेना नेत्यासोबत आलेल्या लोकांना थेट दर्शन तर भाजप नेत्याच्या कुटुंबाला ताटकळत ठेवलं.

पंढरपुरात व्हिआपी दर्शनावरून दुजाभाव? शिवसेना नेत्यासोबत आलेल्या लोकांना थेट दर्शन तर भाजप नेत्याच्या कुटुंबाला ताटकळत ठेवलं

मुस्लीम देश पाकिस्तानात फक्त हिंदूंचाच बोलबाला, या शहरात जिकडे तिकडे फक्त हिंदूच!.

मुस्लीम देश पाकिस्तानात फक्त हिंदूंचाच बोलबाला, या शहरात जिकडे तिकडे फक्त हिंदूच!

अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये खळबळ! मृतांचा आकडा आला समोर, शेकडो जखमी.

अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये खळबळ! मृतांचा आकडा आला समोर, शेकडो जखमी