विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ईडीच्या फेऱ्यात? काय आहे नेमकं प्रकरण

महेश पवार, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 17, 2023 | 8:27 AM

माजी मंत्र्यांचा नातेवाईक, आमदार, DYSP, एक सहाय्य्क पोलीस निरीक्षक परभणी माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, कन्नडमधील नगरसेवक, काही सरपंच अशी ही भली मोठी यादी आहे.

मुंबई : दिल्ली – मुंबई कॉरिडॉरसाठी औरंगाबादमध्ये २०१६ साली जमिनी घेण्यात आल्या. जमिनीच्या शेतकऱ्यांना गुंतवणुकीसाठी वेगवेगळी आमिषे दाखविण्यात आली. बिडकीन आणि परिसरातील गावे या घोटाळ्याची केंद्रबिंदू होती.

गुंतवणूक केलेल्या शेतकऱ्यांना दरमहा ५ टक्के परतावा देण्याचे मान्य करण्यात आलं. पण, प्रत्यक्ष थेट २५ टाक्याचा परतावा दिला. गोणी भरभरून पैसे आले. आरोपीच्या जाळ्यात ३० गावातील शेतकरी सापडले. २०२१ साली ३० – ३० हा घोटाळा उघडकीस आला.

३० – ३० घोटाळ्याचा मुख्य आरोपी संतोष राठोड याला अटक केली. पोलीस तपासात त्याच्या डायरीत अनेक नावे समोर आली आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह अनेक राजकीय पुढारी आणि नगरसेवक यांची नावे समोर आली आहेत. ही यादी पोलिसांनी ईडीला दिल्यामुळे आता या प्रकरणात ईडीची एन्ट्री झाली आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI