AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pravin Darekar on PM | मोदींकडून शेतकरी कायदे रद्द, प्रवीण दरेकर म्हणतात, आजचा काळा दिवस

| Edited By: | Updated on: Nov 19, 2021 | 2:15 PM
Share

आजचा दिवस हा शेतकऱ्यांसाठी काळा दिवस आहे. शेतकऱ्यांचे नेते म्हणून शरद जोशींनी आपलं आयुष्य पणाला लावलं होतं. शेतकऱ्यांच्या पायातल्या शृंखला दलालांच्या बेड्या आपण काढा.

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा सन्मान राखत तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला. हे कायदे मागे घेण्याची घोषणा करतानाच आता नवी सुरुवात करूया असं मोदी म्हणाले. तर, भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मात्र आजचा दिवस काळा असल्याचं म्हटलं आहे. ही प्रतिक्रिया देताना दरेकर यांनी शेतकरी नेते शरद जोशी यांच्या विचारांचा दाखलाही दिला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आजचा दिवस हा शेतकऱ्यांसाठी काळा दिवस आहे. शेतकऱ्यांचे नेते म्हणून शरद जोशींनी आपलं आयुष्य पणाला लावलं होतं. शेतकऱ्यांच्या पायातल्या शृंखला दलालांच्या बेड्या आपण काढा. शेतकऱ्यांना बाजारात मुक्त व्यवहार करू द्या. त्यांच्या बांधावर माल खरेदी करू द्या. दलाल, ट्रान्स्पोर्ट, कमिशन हे सर्व जाईल तरच शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईल, असं शरद जोशी म्हणायचे, असं दरेकर यांनी म्हटलं आहे.