तुळजापूर येथे रंगणार बैलगाडी शर्यतीचा थरार, राज्यभरातून स्पर्धकांचा सहभाग
VIDEO | महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या तुळजापूर येथे रंगला बैलगाडी शर्यतीचा थरार, राज्यभरातून शेतकऱ्यांचा सहभाग
तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या तुळजापूर येथे बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणार असुन त्याची तयारी करण्यात आली आहे. अखिल भारतीय बैलगाडा संघटना व शिवबाराजे प्रतिष्ठान तुळजापुरच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातून शेतकरी आपला बैलगाडी घेऊन या स्पर्धेसाठी सहभागी झाले आहेत. शेतकरी आणि आयोजकांनी तयारी केली असून जवळपास 70 ते 80 बैलगाडा सहभागी झाले आहेत. लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आले आहेत. दरम्यान शेतकऱ्यांनी एकच नाद बैलगाडा शर्यत, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत या स्पर्धेत सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Published on: Mar 26, 2023 04:10 PM
Latest Videos
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?

