Satara | साताऱ्यात कोरोना निर्बंध पायदळीत तुडवत बैलगाडी शर्यतीचं आयोजन

एकीकडे सामान्य जनता लॉकडाऊनचे नियम काटेकोरपणे पाळत असताना दुसरीकडे अशा शर्यतींच्या माध्यमातून शेकडो लोकं एकत्र येऊन सर्व नियम पायदळी तुडवत आहेत.

सातारा : राज्यात बैलगाडी शर्यतींवर बंदी आहे तरी सुद्धा सातारा जिल्ह्यातील मायणी परिसरात सध्या बैलगाडी शर्यतींचा अक्षरशः धुरळा उडाला आहे. या शर्यतींवर बंदी असून सुद्धा शेकडो लोकांच्या उपस्थितीमध्ये या शर्यती पार पडत आहेत. यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असताना प्रशासन मात्र आजून ढिम्मच आहे. एकीकडे सामान्य जनता लॉकडाऊनचे नियम काटेकोरपणे पाळत असताना दुसरीकडे अशा शर्यतींच्या माध्यमातून शेकडो लोकं एकत्र येऊन सर्व नियम पायदळी तुडवत आहेत. विशेष म्हणजे मायणी पोलीस प्रशासनापासून अवघ्या 5 किमी अंतरावर पार पडणाऱ्या या शर्यतींकडे प्रशासन का दुर्लक्ष करत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI