पंढरपुरात वैष्णवांचा मेळा, लाखो भाविक चंद्रभागेच्या तीरावर.. पाहा Video
चंद्रभागेच्या तीरावर हजारो वारकऱ्यांची गर्दी दिसून येतेय. जवळपास अडीच ते तीन लाख भाविक पंढरपूरमध्ये आज दाखल झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय.
पंढरपूरः कार्तिकी एकादशीनिमित्त (Kartiki Ekadashi) लाखो भाविक पंढरपुरात (Pandharpur) दाखल झाले आहेत. कोरोना संकटामुळे मागील दोन वर्षांपासून वारीमध्ये खंड पडला होता. मात्र या खंडानंतर आज पहिल्यांदाच वारकऱ्यांना पंढरपुरात कार्तिकी एकादशीसाठी वारकऱ्यांना परवानगी मिळाली आहे. त्यामुळे लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले आहेत. आज पहाटेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadanvis) यांनी विठ्ठल- रुक्मिणीची महापूजा केली. यावेळी पत्नी अमृता फडणवीस यादेखील उपस्थित होत्या. मानाचे वारकरी उत्तमराव साळुंखे यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी कलावती साळुंखे यादेखील उपस्थित होत्या. चंद्रभागेच्या तीरावर हजारो वारकऱ्यांची गर्दी दिसून येतेय. जवळपास अडीच ते तीन लाख भाविक पंढरपूरमध्ये आज दाखल झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?

