50 वर्षांपासून ‘हा’ नियम पाळला, विठ्ठलपूजेचे मानाचे वारकरी कोण? कार्तिकी एकादशीनिमित्त चंद्रभागा तीर भक्तिमय!

| Updated on: Nov 04, 2022 | 8:57 AM

ज एकादशीनमित्त साधारण अडीच लाख वारकरी पंढरपूरात दाखल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

50 वर्षांपासून हा नियम पाळला, विठ्ठलपूजेचे मानाचे वारकरी कोण? कार्तिकी एकादशीनिमित्त चंद्रभागा तीर भक्तिमय!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पंढरपूरः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते आज कार्तिकी एकादशीनिमित्त (Kartiki Ekadashi) विठ्ठलाची शासकीय पूजा करण्यात आली. आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पंढरपुरातील (Pandharpur) श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करण्यात आली. तर औरंगाबाद जिल्ह्यातील उत्तमराव साळुंखे यांना मानाच्या वारकऱ्याचे स्थान मिळाले. साळुंखे यांनीदेखील सपत्नीक विठ्ठलपूजेत सहभाग नोंदवला.

उत्तमराव साळुंखे हे औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील शेतकरी आहेत. मागील ५० वर्षांपासून साळुंखे कुटुंबियांनी न चुकता पंढरपुरात वारी केली आहे. याचेच हे फळ असल्याची प्रतिक्रिया साळुंखे दाम्पत्याने दिली.

आज कार्तिकी एकादशीला साक्षात विठुरायाच्या मूर्तीच्या पूजेचा मान मिळाला. यावेळी स्वतःसाठी काहीही न मागता राज्यातील सर्व शेतकऱ्यांवरील संकट दूर करण्यासाठी विठ्ठल-रुक्मिणीकडे साकडं मागितल्याची भावना साळुंखे यांनी व्यक्त केली.

पंढरपूरातील या महाजूजेदरम्यान, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्यासह जिल्ह्यातील इतर आमदार खासदार उपस्थित होते.

दरम्यान, आज संत नामदेव महाराजांची 752 व्या जयंतीनिमित्त फडणवीस यांनी येथील नावदेव वाड्यालाही भेट दिली. आज शासकीय महापूजेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सपत्निक दिली नामदेव वाड्याला भेट दिली. नामदेव महाराज मंदिराचे दर्शन त्यांनी घेतलं.

पंढरपूर कॉरिडॉरच्या पार्श्वभूमीवर नामदेव वाड्याची भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. नामदेव महाराजांच्या 17 व्या वंशजांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नामदेव पगडी घालून सत्कार केला.

शासकीय पूजा झाल्यानंतर राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांसाठी विठ्ठल दर्शन सुरु करण्यात आले आहे. चंद्रभागा नदीपात्रात वारकऱ्यांची स्नान करण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी जमली आहे. स्थानिक प्रशासनातर्फे चंद्रभागा नदीतीरावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

सकाळपासूनच धारकरी, वारकरी नदीपात्रात राहुट्या ठोकून आहेत. आज एकादशीनमित्त साधारण अडीच लाख वारकरी पंढरपूरात दाखल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. चंद्रभागा नदीतीरी फक्त वारकऱ्यांची गर्दी पाहायला मिळतेय.