video : जनतेच्या प्रश्नावर अधिवेशन व्हायला पाहिजे होतं- पंकजा मुंडे
अर्थसंकल्पीय अधिवेशनातील कामकाजावर भाजप नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी नाराजी दर्शवली आहे. विरोधकांनी या अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. तर सत्ताधाऱ्यांनी ही मागणी धुडकावून लावली होती. त्यावर पंकजा मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करतानाच भाजपलाही (bjp) घरचा आहेर दिला आहे. राजीनामा मागणारे विरोधक आणि राजीनामा देणारे सत्ताधारी अधिवेशनात हेचं […]
अर्थसंकल्पीय अधिवेशनातील कामकाजावर भाजप नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी नाराजी दर्शवली आहे. विरोधकांनी या अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. तर सत्ताधाऱ्यांनी ही मागणी धुडकावून लावली होती. त्यावर पंकजा मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करतानाच भाजपलाही (bjp) घरचा आहेर दिला आहे. राजीनामा मागणारे विरोधक आणि राजीनामा देणारे सत्ताधारी अधिवेशनात हेचं दिसलं. जनतेच्या प्रश्नावर अधिवेशन व्हायला पाहिजे होतं, असा टोला पंकजा मुंडे यांनी भाजपलाही लगावला आहे. वरळीतील मार्स-1 या प्री-प्रायमरी शाळेचं उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी काश्मीर फाईल्स हा सिनेमा पाहिला नसल्याचंही स्पष्ट केलं.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा

