Nana Patole | परमबीरांना देशाबाहेर फरार करण्यात केंद्राचा हात, नाना पटोलेंचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

परमबीरांना देशाबाहेर फरार करण्यात केंद्र सरकारचा हात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अटक होण्याच्या भितीनं देश सोडून परदेशात गेले असावेत, असा संशय व्यक्त केला जात. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणांना संशय आहे की, परमबीर सिंह युरोपातील देशात लपले असावेत. मात्र, त्यासंदर्भातील पुरावा अद्याप यंत्रणांना मिळालेला नाही. अँटिलिया स्फोटक प्रकरण (Antilia case) आणि मनसुख हिरेन (Mansukh Hiren) हत्या प्रकरणात एनआए तपास करत आहे. याप्रकरणात चौकशीसाठी एनआयएने परमबीर सिंह यांना अनेकेवळा समन्स पाठवले आहे. पण अद्याप एकही समन्स परमबीर सिंह यांच्या हाती पडलेलं नाही. कारण ज्या पत्त्यावर समन्स पाठवण्यात आलं आहे, त्या पत्त्यावर परमबीर सिंह नाहीत, अशी माहिती मिलाली आहे. त्यामुळे सिंग अटकेच्या भीतीनं देश सोडून पळून गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. परमबीरांना देशाबाहेर फरार करण्यात केंद्र सरकारचा हात असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI