Tahawwur Rana : तहव्वुर राणा १८ दिवस एनआयएच्या कोठडीत, निम्म्या रात्री पटियाला हाऊस कोर्टात नेमकं काय काय झालं?
Tahawwur Rana In NIA Custody : 26 / 11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणाला पटियाला हाऊस कोर्टाने १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे.
पटियाला हाऊस कोर्टाने 26 / 11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली. एनआयएच्या वकिलांनी पटियाला हाऊस कोर्टात २० दिवसांच्या रिमांडची मागणी केली होती. तहव्वुर राणा याला आता एनआयएच्या मुख्यालयात नेण्यात आलं आहे.
दहशतवादी तहव्वुर राणाला काल अमेरिकेतून भारतात आणल्यानंतर एनआयएने त्याला विमानतळावरच अटक केली. त्यानंतर त्याला पटियाला हाऊस कोर्टात सुनावणीसाठी हजर करण्यात आलं. सुनावणीदरम्यान एनआयएने पटियाला हाऊस कोर्टात तहव्वुर राणाचा २० दिवसांचा रिमांड मागितला होता. त्यावर न्यायालयाने १८ दिवसांची कोठडी मंजूर केली. आता एनआयएकडे मुंबई हल्ल्यात नेमकं काय काय केलं हे त्याच्याकडून काढून घेण्यासाठी १८ दिवसांचा अवधी असणार आहे.
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका

