पवनराजे निंबाळकर केसच्या सुनावणीत असं काय घडलं? ओमराजे निंबाळकर स्पष्टच बोलले…
पवन राजेनिंबाळकर हत्या प्रकरणाचा तब्बल 20 वर्षांनंतर आज निकाल अपेक्षित होता. मात्र, हा निकाल पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आला आहे. यामुळे पवन राजेनिंबाळकर यांचे पुत्र आणि खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी माध्यमांसमोर भावना व्यक्त करत न्यायाची अपेक्षा करत आहेत असं सांगितलं.

ओम राजेनिंबाळकर म्हणाले, “त्यांच्या हत्येनंतर माझा राजकीय जन्म झाला, मी त्यांच्यासाठी लढतोय, धाराशिवची जनता माझ्या पाठीशी आहे. निकाल देण्याच्या बाबतीत काही कमतरता आहे ती पूर्ण करण्यासाठी कोर्टानं 20 जून ही तारीख ठेवली आहे.”
ते पुढे म्हणाले, “आमच्या दोन्ही कुटुंबानं 20 वर्षे 13 दिवस अविरत संघर्ष केला आहे. सामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी मोठा लढा द्यावा लागतो. माझी क्षमता होती म्हणून मी हायकोर्टात रिट याचिका दाखल केली. त्यानंतर हे प्रकरण CBI कडे गेलं. आरोपींनी खटला लांबवण्यासाठी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात धाव घेतली, पण आम्ही संघर्ष सुरू ठेवला.”
Published on: Jun 16, 2026 12:52 PM
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी