नवी दिल्लीत कर्तव्य भवन-3 ची निर्मिती, सरकारी कामकाजाला मिळणार गती
पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील कर्तव्य पथावरील नवीन कर्तव्य भवनचे उद्घाटन करणार आहेत. ही आधुनिक इमारत अनेक सरकारी मंत्रालये एकाच छताखाली आणेल, ज्यामुळे प्रशासनात वेग आणि समन्वय वाढेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ६ ऑगस्टला नवी दिल्लीतील कर्तव्य पथावरील नव्या कर्तव्य भवन या आधुनिक इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. ही इमारत अनेक सरकारी मंत्रालये आणि विभागांना एकाच छताखाली आणण्यासाठी तयार केली आहे. ज्यामुळे सरकारी कामांमध्ये अधिक वेग, समन्वय आणि नवनिर्मितीला चालना मिळेल. सध्या अनेक मंत्रालयांची कार्यालये शास्त्री भवन, कृषी भवन आणि उद्योग भवन यांसारख्या इमारतींमध्ये आहेत. या इमारती ज्या १९५० ते १९७० च्या दशकात बांधल्या गेल्या आहेत. कर्तव्य भवन-३ बद्दल बोलायचं झाल्यास, ही इमारत सुमारे १.५ लाख चौरस मीटर परिसरात पसरलेली आहे. या ठिकाणी अनेक सरकारी मंत्रालयांची कार्यालये आहेत.
पाहा व्हिडीओ
Published on: Aug 05, 2025 07:31 PM
Latest Videos
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
