पोलिसांकडून मनसे पदाधिकाऱ्यांना समज !
सिटी चौक पोलीस ठाण्यात राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 116, 117, 153 आणि सहकलम 135 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. इतकंच नाही तर राज्यभरातील 15 हजार मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली असल्याची माहिती दिलीय.
पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS)अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबादेतील जाहीर सभेनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. आता औरंगाबादेतील (Aurangabad) सिटी चौक पोलीस ठाण्यात राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 116, 117, 153 आणि सहकलम 135 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. इतकंच नाही तर राज्यभरातील 15 हजार मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली असल्याची माहिती दिलीय. या सगळ्या प्रकारानंतर खालकर चौकात मनसे पदाधिकारी एकत्र आल्याने पोलीसही चौकात दाखल झालेत. दरम्यान पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना समज दिलीये. पोलिसांनी मनसे सरचिटणीस अजय शिंदे आणि इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहन केलंय.
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..

